किन्ही नंदपूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमिपूजन सोहळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256255)

पांढरकवडा तालूक्यातील किन्ही नंदपूर येथे १३४६१००० अक्षरी एक कोटी चौतिस लाख एकसष्ट हजार रूपये या कामाचे भुमिपूजन व लोकार्पण सोहळा मा. श्री. मिनिष रमेशराव मानकर मा.अर्थ व बांधकाम सभापती तथा विद्यमान जिल्हा परीषद सदस्य यांचे हस्ते पार पाडला. या कार्यक्रमाच्या अक्ष्यक्षस्थानी श्री विजयभाउ तेलंगे, प्रमुख पाहूणे श्री नरेंद्रजी नंदूरकर उपसभापती पंचायत समिती पांढरकवडा यांच्या उपस्थितीत पार पडला.

तसेच आरोग्य प्रा. उपकेंद्राकरीता ११३२२००० व पाणी टंचाई अंतर्गत पाईपलाईन कामाचे लोकार्पण व शाळा वर्ग खोली बांधकाम ९९९००० या कामाचे मान्यवराच्या व गावकऱ्यांच्या हस्ते भुमिपूजन व लोकार्पण साहेळा संपन्न झाला.

यावेळी श्री मिनिषभाउ मानकर यांनी मा. गांधीजी व बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व व्दिप प्रज्वलित करूण कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी स्वर गायीका लतादीदी मंगेशकर यांना दोन मिनिट मौन पाळून आपल्या कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी मंचकावर किन्हीं नंदपूर सरपंच श्री. अविनाश कुमरे, उपसरपंच सौ. उज्वला मिंदेवार, ग्रा. पंचायत सदस्य गौतम सामृतवार, किन्ही नंदपूर सोसायटीचे अध्यक्ष व दत्त मंदिर देवस्थानचे सचिव श्री. शंकररावजी मिंदेवार, अभय कट्टेवार, निलेश सामृतवार, मोहन बंडेवार, मोहन ठाकरे, ज्ञानेश्वर वाघमारे, इम्राहन पळाण, रामदास इरदंडे, पोलिसपाटिल कैलास ठाकरे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी निवेषभाउ मानकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ग्रामिन भागामध्ये लोकांना प्रा. आरोग्य उपकेंद्र व पाणी जिवनावश्यक गरज असल्याचे सांगीतले. तसेच या दोन गोष्टी प्रत्येक गावाला असणे गरजेचे आहे व मि ते सतत पाठपुरावा करूण मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातुनच मला जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळत आहे. तसेच बाकी मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील व बाहेरगावाती संजय मुठ्ठावार, नारायण लांडे, सुभाष सामृतवार, तंटामुक्ती अध्यक्ष पवन बाकमवार, अशोक देशट्टीवार, राजू राठोड, संजय पवार, रवि बोमेनवार, प्रभाकर गोर्लेवार, भास्करराव आदे, पांडू लिंगरवार, राजू काळे, गोलू कोटरंगे, गजू सोयाम, शाळा समिती अध्यक्ष तसेच यावेळी राजूभाउ बंडेवार यांच्या प्रयत्नाने गावातील कामाचे प्रयत्न केल्याने गावकरी समाधान मानत आहे. तसेच इश्रम कार्ड चे सुध्दा फिमध्ये कार्ड काडून देत आहे. यावेळी या

कार्यक्रमाचे संचालन कु. संगिता उईके व आभार प्रदर्शन विशाल सामृतवार यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील तरूण मुलांनी अतिशय परीश्रम घेतले.