श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी सोनुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने, ब्रम्हंलीन वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्य स्मरण सोहळा ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा


दिनांक…… २०/१/२०२१ रोजी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्य स्मरण सोहळा ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन सोनुर्ली येथे करण्यात आले होते, सलग ( सहा )६ वर्षापासुन सोनुर्ली या गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असुन, या वर्षी सोनुर्ली ग्रामपंचायत अन-पोच निवडणुक जनतेच्या पुढाकाराने सुद्धा आली आणि सोनुर्ली हे गाव एक आदर्श गाव म्हणुन सुद्धा संबोधल्या जात आहे, आणि त्यांच अनुशंगाने एक सुंदर उपक्रम म्हणुन ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आला, दिनांक २०/१/२०२१ रोजी ग्रामगीता ज्ञानयज्ञ सोहळ्याचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्दघाट जि.प. सदस्य निमिषभाऊ मानकर हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन अशोकराव भेंडाळे ASI वडकी पोलीस स्टेशन , गुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख गंगाधरजी घोटेकर, विजुभाऊ तेलंगे मोहदा तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा युवा प्रमुख प्रा. आशुतोष चौधरी हे होते,