पहापळ गावाच्या मासिक सभेत दारूबंदी ठराव मंजूर ,गावात दारूबंदी ची कडक अंमलबजावणी होणार

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

       पहापळ गावात या लाॅकडाऊन मध्ये मोठ्या अवैध दारू विक्री चालू असून व बाहेर गावातील लोकांची ये-जा गावात वाढली असून गावात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, व दारूमुळे गावातील स्वास्थ देखील बिघडत आहे,गावात अवैध दारू विक्री सुरू होती पण पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती व त्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती, अनेक वर्षांपासून पहापळ मध्ये दारूबंदी करावी अशी मागणी गावकरी करत आहे, तरी या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायतीने मासिक सभेत दारूबंदीचा ठराव पारित केला आहे.
       पहापळ गावात अवैध दारू बंद करावी या आशयाचा ठराव ग्रामपंचायत पहापळ मार्फत पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे पाठवण्यात आला व त्याची प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कार्यालय, यवतमाळ तसेच आमदार आर्णि- विधानसभा, उपविभागीय अधिकारी, पांढरकवडा तहसील कार्यालय, पांढरकवडा येथे सादर करण्यात आली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांची चौकशी करून अवैध दारू विक्री बंद त्वरित करावी अशी मागणी केली आहे.