

.
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
पांढरकवडा शहर व तालुक्यात कोव्हीड-19 साथ रोगामुळे वाढती रुग्ण संख्या व वाढते मृत्यूचे प्रमाण यामुळे बॅंका मध्ये होणारी प्रचंड गर्दी यापासून बँकेच्या कर्मचारी वर्गात रोगाचा प्रसार होवू शकते, त्यामुळे यावर तोडगा म्हणून तालुका कोरोना नियमन समन्वय समितीने मागील आठवड्यात बँकेमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला, पण ग्राहकाकडून या निर्णयाला विरोध केला गेला व अनेकांनी हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी तालुका कोरोना नियंत्रण समन्वय समिती कडे विनंती केली व तो निर्णय मागे घेण्यात आला.
पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामाला जोर आला असून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करावे लागतात, त्यामुळे अश्या नियमामुळे त्यांना अडचण निर्माण होते व अन्य ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समन्वय समितीने मागील निर्णय मागे घेतला व सोबतच बँक कर्मचारी यांना 15 दिवसाला कोरोना चाचणी करावी अश्या मार्गदर्शक सूचना केल्या. व ज्या नागरिकांना लक्षणे असेल त्यांनी पांढरकवडा शहरात नगरपरिषद नागेश्वर जिड्डेवार भवन, व उपजिल्हा रुग्णालय येथे करावी असेही सांगितले आहे.
