
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,करंजी
आज करंजी येथे माजीमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमीत्य घेण्यात आलेल्या नेत्र तपासनी शिबीराचे उद्धघाटन सोहळा पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम यांच्या शुभहस्ते व करंजी येथिल सरपंच सौ मिनाताई रामपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी संजयभाऊ आंबटकर,विलासजी होलगिलवार,संजयजी कुंडलवार,आंनदभाऊ साठे,भिमरावजी आत्राम,कुलसंगे मेजर,वाठोडाचे सरपंच सुधाकर जाधव,सौ सुरेखाताई आंबटकर,शिवा मेश्राम,परेश मडावी,रुपेश राठोड,यश राठोड,अमोल जाधव,अंकित पेंढारकर,निकेश जाधव,जिवन राठोड,गितेश राठोड,गणेश राठोड व गावकरी बांधव उपस्थित होते,
समता फाऊंडेशन मुंबई च्या सहाय्याने माजी मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्र तपासनी शिबीर करंजी आज घेण्यात आलेल्या शिबीरा मध्ये एकुण १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्या पैकी ५७ रुग्णांना ९ जुलै रोजी शस्रक्रियासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांवगी येथे पाठविण्यात येणार आहे सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे..
