
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पांढरकवडा, दि . १५ ला दुपारी लिंगटी येथील दोन युवक सायखेडा धरण १०० % भरून ओव्हर फ्लो होत असल्यामुळे धरणात जावून सेल्फी काढत असतांना दोघे जण बुडाले . यात एका युवकाला पोहणे येत असल्यामुळे तो सुदैवाने बचावला तर एक युवक धरणात बुडून बेपत्ता झाला
आज दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान लिंगटी येथील वामन भुमन्ना निमनवार (२०) व रोहन दडांजे (१९) हे दोन युवक सायखेडा धरणात सेल्फी काढायला गेले होते सेल्फी काढत असतांना दोघांचाही पाय घसरला त्यामुळे ते दोघेही धरणात बुडायला लागले
यात रोहन दडांजे याला पोहणे येत असल्यामुळे तो धरणातून बाहेर पडला तर वामन निमनवार याला पोहणे बरोबर येत नसल्यामुळे तो धरणात बुडाला . याची माहिती पांढरकवडा येथील तहसिलदार रामदास बिजे व पांढरकवड्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांना होताच ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले . त्यांनी पोहणाऱ्या भोई बांधवांना धरणात उतरवून त्याचा शोध घेतला परंतु संध्याकाळ पर्यंत वामनचा मृतदेह हाती लागला नाही . तहसिलदार बिजे यांनी यवतमाळ येथील एनडीआरएफ टिमला पाचारण केले शनिवारी सकाळी एनडीआरएफ टीम पांढरकवडा पोलीस टीम व भोई समाजातील धरणाची माहिती असणारी टीम अश्या तीन टीम मिळुन सकाळपासून धरणात उतरवून मोठी शोध मोहीम राबवली असता दुपारी तीन वाजताच्या दरम्यान लिंगटी गावातील लोखंडी पुला जवळ वामनचा मृतदेह आढळला पोलीसानी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला.
