
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आदिवासी सेवक स्व.शालीकराव वामनराव परचाके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जय पेरसापेन क्रीडा मंडळ दाभा ( मानकर) ता.केळापूर जि.यवतमाळ यांच्या वतीने आयोजित कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामने ..या सामन्याच्या ठिकाणी काल दि.२१-२-२०२२ रोजी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा देताना माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यावेळी माणीकराव परचाके ,सुरेशजी सावंत ,राजुभाऊ सराटे,रविभाऊ राठोड,संदीपजी कुडमते,सुभाष जी राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.सामने यशस्वी करण्यासाठी नागोराव आत्राम, रविंद्र कुडमते,शेखर परचाके,रवि राठोड ,विजय राठोड, उत्तम परचाके, भानुदास परचाके, पुंडलिक मरापे, पुरूषोत्तम मरापे,रोशन कोडापे , अंकुश गेडाम परिश्रम घेत आहे.कार्यक्रमास गावकरी बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
