भोकर येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी बेलदार समाजाचे निवेदन— निषेधाचा ठराव

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

दि. २१/०१/२०२१ रोजी दिवशी बु,  ता. भोकर जि. नांदेड येथील ५ वर्षीय आदिवासी मुलीवर गावातील एका नराधमाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे, ह्या घटनेचा तीव्र निषेध.

नांदेड जिल्यातील भोकर तालुक्यातील दिवशी बु गावातील आदिवासी मुन्नूरवारलु समाजाच्या ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या
मुख्य आरोपीस व इतर आरोपीविरुद्ध महाराष्ट्राने तयार करत असलेल्या MAHARASHTRA SHAKTI CRIMINAL LAW (MAHARASHTRA AMENDMENT) ACT 2020 AND THE SPECIAL COURT AND MACHINERY FOR IMPLEMENTATION OF MAHARASHTRA SHAKTI CRIMINAL LAW 2020 प्रमाणे कारवाई करून आरोपीला शक्ती कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा करणे बाबत मा. श्री सुरेश कव्हाळे तहसिलदार पांढरकवडा जि. यवतमाळ मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक,नांदेड यांना बेलदार तत्सम समाज संघटना यवतमाळ जि. यवतमाळ तर्फे निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आला. यावेळी श्री अॅड के जी मुत्यालवार( जिल्हा अध्यक्ष ) श्री अरविंद गांगुलवार श्री विनायक वद्देवार , श्री संदिप पदलमवार, श्री सुनिल अबंरवार, श्री दिपक आईदलवार , श्री किशोर देशट्टीवार, श्री सुभाष आकुलवार ,विजय घडसनवार, श्री अनिल देशट्टीवार गणेश पडलवार , हिंमाशुं पडलवार आदी उपस्थित होते.