

प्रतिनिधी :सुमित चाटाळे पांढरकवडा
वाढदिवस म्हटला की महागडे कपडे, सजावट, हाॅटेलमध्ये पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक ईत्यादी नानाविध वारेमाप खर्च केला जातो.
मात्र या खर्चाला फाट देत व कोरोना विषाणू चे संकट लक्षात घेता पांढरकवडा येथील पत्रकार राहुल वऱ्हाडे या युवकानी वाढदिवसाच्या निमित्ताने पांढरकवडा शहरातील वृध्दआश्रमात वृध्दांना व उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळ व मास्क वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. राहुल वऱ्हाडे हा युवक मागील पाच वर्षांपासुन आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील वृध्दआश्रमात व रूग्णालयात फळ वाटप करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत आहे. आज दि. ३ मे रोजी वाढदिवसानिमित्त शहरातील वृध्दआश्रमात व उपजिल्हा रुग्णालयात फळ व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी राहुल वऱ्हाडे, सौरभ ठाकरे, अक्षय सुरोशे, प्रज्वल ठाकरे, अनिकेत ठाकरे, चैतन्य पोतदार, सौरव ठाकरे, निखिल गुरूणुले आदी मित्र परिवार उपस्थित होते.
