
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
रक्ताचे नाते ट्रस्टचे मा. राम बांगड यांच्या १४१ व्या रक्तदानानिमित्त पुण्याला आंतरराज्यीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विवीध जिल्ह्यातून मोठया प्रमाणात रक्तदाते या भव्य शिबिरासाठी येणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक बांधिलकी जपत यवतमाळ येथील रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच त्यांचे रक्तदाते 7 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या रक्तदान शिबिराला जाणार आहे. असे रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रफुल्ल गणपत भोयर यांनी सांगितले आहे. हा रक्तदान चळवळीतला जनजागृतीचा महत्वाचा पैलू आहे. गरिबांना शासनाकडून मोफत रक्त मिळवून देण्याचा ध्यास घेत सुरू झालेला रक्ताचा प्रवास किती संघर्षमय आहे, हे प्रत्येक रक्तवीराला कळणार आहे.
