

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
शेतकरी आंदोलन समर्थनार्थ आज रोजी राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन पाहायला मिळाले त्यालाच प्रतिसाद म्हणून पांढरकवडा येथे विविध राजकिय पक्ष आणि अनेक संघटना यांनी पाठींबा देत या चक्का जाम आंदोलन मध्ये सहभागी झाले.
दुपारी तालुक्यातील शेतकरी संघटना राजकिय पक्ष आणि अनेक संघटना व संयुक्त किसन मोर्चा वतीने पांढरकवडा येथे वाय पॉईंट जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चक्का जाम केला, काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व वाहतूक पूर्वरत केली.
