
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
पहापळ या गावा मध्ये अवैध दारू खूप मोठ्या प्रमाणात चालू आणि गावातील लहान मुल दारु च्या आहारी जात आहे, ग्रामपंचायत ने तसा ठराव मंजूर करून पोलिस स्टेशन पांढरकवडा यांच्या कडे पाठवला तरी स्थानिक पोलीस प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे प्रशांत करपते ( ग्रामपंचायत सदस्य पहापळ, जिल्हाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, यवतमाळ) यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन, पहापळ येथील दारु बंदी करुन गावकऱ्यांना सहकार्य करावे. त्याचबरोबर पहापळ हे गाव सहा हजार लोकसंख्या पेक्षा जास्त असलेले गाव आहे व पहापळ गावाला पोलीस चौकीची गरज असल्याचे गरज स्पष्ट केली. व सदर निवेदन सादर केले..
