पहापळ गावात स्वयंम स्फूर्तीने 3 दिवसाचा जनता कर्फ्यू

21/04/2021
पांढरकवडा

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ

ग्राम पंचायत पहापळ येथील सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्राम पंचायत सदस्य, तलाठी, आरोग्य सेवक, आशा सेविका यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याकरीता आवाहन केले.

      वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे गावात वाढती कोरोना रुग्णांची संख्या यामुळे सर्व गावकरी चिंतेत असून समस्त गावकरी यांच्या वतीने ग्राम प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे, गावामध्ये फक्त वैद्यकिय सेवा सुरू राहणार आहे.
22 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यत या कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले असून समस्त गावकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत पहापळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.