प्रतिनिधी:सुमित चाटाळे ,पांढरकवडा /

आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाला यश .
यवतमाळ – जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या पांढरकवडा व घाटंजी या तालुक्याच्या ठिकाणी भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्यामुळे बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानले.
आदिवासी समाजातील लोककला , सामुहिक लग्न, परंपरागत सण,उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या द्रुष्टीने आदिवासी भागामध्ये जागा उपलब्ध नसते त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य व इतर गुणांना वाव नसतो आणि त्यांच्यात असलेले कौशल्य आणि सांस्कृतिक बुजरेपणा घालविणे यासाठी आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटंजी व पांढरकवडा येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्यामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाने ८ फेब्रुवारी २०२० च्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झाल्यावर निर्णय घेण्यात आला.
