
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बजाज आलीयांज जनरल इन्शुरन्स व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुक्यातील लोहारा, एकलारा , शिवरा, श्रीरामपूर , कृष्णापूर , पिंप्री दुर्ग , मांडवा , सोयटी कोपरी, इंझापूर, वालधुर, दापोरी व चिकना या 13 गावामध्ये लोकसहभागातून कृषी व उपजिविका विकास कार्यक्रम सुरु झाला आहे त्या प्रकल्पामध्ये महिला विकाससाठी उपजिविका विकास मध्ये शेळीपालन व्यवसाय , बोकड पालन व्यवसाय, दुग्द व्यवसाय, महिलांमार्फत गाव स्तरावर शेती उपयोगी औजारांच्या औजार बँक तयार करणे, गाव स्तरावरील पिण्याच्या पाण्याचे बळकटीकरण करणे, मत्स पालन व्यवसाय , वन उपज व्यवसाय व प्रक्रिया कार्यक्रम, शासकीय योजनाची सांगड घालणे , गाव स्तरावर माहिती केंद्र उभारणे, गावातील तरून मुला,मुली करिता तांत्रिक प्रशिक्षण व व्यवसाय उभारणी करणे, गाव स्तरावर छोटे छोटे उद्योग उभारणे , आदि. बाबी वर प्रकल्पामध्ये काम होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून गाव स्तरावर ग्राम सभा घेऊन संयुक्त महिला समिती स्थापन केल्या त्या समित्यामार्फत महिला मेळावा घेण्यात आला हा महिला मेळावा गावातील महिला व बचत गटाचे बळकटीकरण करणे यासाठी घेण्यात आला. सदर महिला मेळाव्यासाठी 485 सदस्य हजर होते. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून राळेगाव तालुका समन्वयक बालाजी कदम होते. त्यांनी सुरु असलेल्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली व या प्रकल्पामध्ये महिलांचा विकास वेगवेगळ्या योजनांसाठी फिरता निधी देऊन कसा साधता येईल हे पटवून दिले या प्रकल्पात जास्तीत जास्त निधी हा महिला विकासावर खर्च करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक महिला सोशल अधिकारी भाग्यश्री पाटील यांनी केले त्यांनी महिलांसोबत वेगवेगळे खेळ स्पर्धा घेऊन प्रकल्प व आरोग्याच्या बाबी समजावून सांगितल्या सूत्र संचालन समीर धुमाळयांनी केले व आभार प्रदर्शन शिवरा संयुक्त महिला समिती अध्यक्ष कल्पना कोवे यांनी केले.
