शिक्षक सेनेतर्फे सुरेश बोरकर यांचा सन्मान सेवानिवृत्तबद्दल केला सन्मान खापरी (केने) शाळेत कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

तालुका प्रतिनिधी/३१ डिसेंबर
काटोल : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,नरखेड तर्फे सेवानिवृत्तीबद्दल सुरेश पुंडलिकराव बोरकर यांचा सहपत्नी शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार जि.प.उच्च प्राथमिक शाळा, खापरी (केने) येथे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी प्रशांत मोहोड तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विशालसिंग गौर,सरपंच आश्विनीताई केने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरेश बोरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३५ वर्ष कार्य केलेले आहे.यात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कार्य करून शाळेचे नाव जिल्हास्तरावर पोहचविण्याचे कार्य केलेले आहे .
यावेळी म.रा.शिक्षक सेना, नरखेड तालुकाध्यक्ष विवेक बोरकर, दिनेश डवंगे, पांडुरंग भिंगारे, सुनिल ढोके,राजेंद्र बोरकर, सतिश ढबाले,राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.