जे. सी . आय राजुरा रॉयल्स द्वारे युवा दिवस साजरा.

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर

जे. सी . आय राजुरा रॉयल्स द्वारे युवा दिवस साजरा.
आपण सर्वांना परिचित असलेले स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण भारतात युवा दिवस म्हणून साजरी करण्यात येते . त्याच प्रमाने गेल्या काही वर्षापासून आघाडीवर असलेले जे. सी . आय राजुरा रॉयल्स ने देखील विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून युवा दिवस साजरा केला. युवा दिवसा निमित्तने जे. सी . आय राजुरा रॉयल्स ने योगा कॅम्प , भाषण स्पर्धा जे.सी. डॉ. मोनिशा पाटणकर यांच्या द्वारे बिल्ट कॉलनी बल्लारपुर येथे आयोजित केले होते. जिथे अनेक युवतींनी अतिशय सुंदर प्रकारे युवा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच जे.सी.डॉ .मोनिशा पाटणकर यांच्या द्वारे योगा कॅम्प सुद्धा घेण्यात आला. युवा दिनाचे अवचित्त साधून महाकाली टायपिंग इन्स्टिट्यूट च्या प्राचार्य सौ. विजयालक्ष्मी कोटकर यांनी संस्थेतील शिकाऊ विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. व त्याचप्रमाणे भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा , रॅली , खोखो स्पर्धा, निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. कार्यक्रमास युवक युवतीनी अतिशय हिरीरीने सहभाग घेतला. जे. सी.आय राजुरा रॉयल्स द्वारा आयोजित केलेल्या या संपूर्ण कार्यक्रमात जे.सी.आय राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जे.सी. स्मृती व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले . कार्यक्रमात पूर्व अध्यक्षा जे.सी. सुष्मा शुक्ला , जे .सी . जयश्री शेंडे,सचिव जे .सी . सुशिला पोरेड्डीवार, जे.सी.मधूस्मिता पाढी, जे.सी.प्रफुल्ला धोप्टे , जे.सी. मोनिशा पाटणकर, जे .सी . रेखा बोढे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.