सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी ‘स्रीशक्ती जागर’फुले दांपत्याने ‘भारतरत्न’ मिळावा – वैशाली डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ

सावित्रीबाई फुले विचारमंच तर्फे अभिवादन

तालुका प्रतिनिधी/११ मार्च
काटोल – सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल तर्फे सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी व महिला दिन निमित्त ‘स्त्रीशक्ती जागर’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
यावेळी विचारमंचच्या अध्यक्षा वैशाली डांगोरे म्हणाल्या, समाजाच्या शेवटच्या घटकांना शिक्षण मिळावे म्हणून फुले दांपत्य अहोरात्र झटले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळावा.व देशातील पहिली शाळा ज्या भिडे वाड्यात काढली त्या भिडे वाड्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे.
समस्त महिलांचे प्रेरणास्त्रोत सावित्रीबाई फुले आहे.सावित्रीबाईंचे विचार अंगीकारून महिला प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहे.महिलांनी आत्मनिर्धाराचा नारा जीवनात स्वीकारून सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विचारमंचाच्या सचिव अँड.भैरवी टेकाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहना खरबडे, संचालन रजनी मानकर तर आभार प्रदर्शन सोनाली तिजारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी वंदना डांगोरे, अर्चना वरोकर, वैशाली श्रीखंडे, उषा भोयर, नंदा भोयर, मोनाली पवार, रेखा पवार, कांचन टेंभे यांनी परिश्रम घेतले.