बँक ऑफ इंडियाच्या वरोरा शाखेत ग्राहकांना सुविधा द्या:मुज्जमिल शेख ,सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची मागणी

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेत ग्राहकांना एक रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे .या रांगेत उभे असताना ना सोशल डिस्टन्स चे पालन होत आहे तसेच ग्राहकांच्या तोंडावर बरेचदा मास्क सुद्धा नसतो त्यामुळे कोरोना चा प्रसार आणखी जोमाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही .तसेच या मार्गावर जागा नसल्याने इथे वाहन जाम होतात त्यामुळे बॅंक च्या आत मध्ये काउंटर वाढवत सर्वसामान्य ग्राहकांना सुविधा करून घ्या या मागणीसाठी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर ला वारंवार सूचना करून देखील यावर कोणतीही उपाय योजना झाली नाही .या बँकेच्या मॅनेजर आमच्याकडे कर्मचारी कमी असल्याचे सांगून चालढकल करीत आहे .त्यामुळे अखेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मुज्जमिल शेख यांनी आज तहसीलदार साहेब व वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी याना निवेदन देत बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर मंडप ची व्यवस्था करून दयावी अशी विनंती केली आहे.निवेदन देते वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मुज्जमिल शेख ,जयंत टेमुर्डे,अविनाश ढेंगळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.