
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा:– तालुक्यातील उखर्डा येथे पावसाळा गेला हिवाळा गेला आता उन्हाळा सुरू झाला तरी सुद्धा गावातली नाले सफाई झालेली नाही . गेल्या काही काळात ग्राम पंचायत ने नाले सफाई कडे दुर्लक्ष केले आहे त्या मुळे नाले तुंबलेल्या अवस्थेत आहे .
सर्वच गावं– शहरामध्ये पावसाळा च्या आधी नाले सफाई केली जाते . माञ उखर्डा ग्राम पंचायत ला अद्याप तसा मुहूर्त गवसला नाही , गावातली नाल्याची घाणेरडी दलदल माजली आहे , नाल्याच्यी दुर्गंधी पसरली आहे नागरिकांना या सगळ्यांचा सामना करावा लागतो आहे , साफ सफाई कडे पूर्णतः दुलक्ष करण्यात आली आहे . गावातली नाल्यांची साफ सफाई करावी असे निवेदन अभिजित कुडे यांनी सरपंच रुपालीताई ठाकरे व सचिव पंकज थूल याना दीले . जर १० दिवसात नाल्यांची साफ सफाई झाली नाही तर आंदोलनं करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला . या वेळी प्रमोद कुडे , गुरू कुडे ,ऋषीकेश कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, रंजीत कुडे व गावकरी उपस्थित होते .
