
पांढरकवडा 10/04/2021
महाराष्ट्रात वाघांसाठी प्रसिद्ध असलेले यवतमाळ जिल्ह्य़ातील अभयारण्य, पांढरकवडा येथून 10 किमी अंतरावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यास मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी व वनसंपदा पाहण्यासाठी अनेक पर्यटक टिपेश्वर अभयारण्यास भेट देत असतात, वाघ, अस्वल, नीलगाय, बाराशिंग्या, हरीण, ससे यासारखे खूप प्राणी पाहावयास मिळतात व वाघ पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या वनस्पती प्रजाती पाहायला मिळतात.
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे कडक निर्बंध लावले असून मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार टिपेश्वर अभयारण्य हे पर्यटकांसाठी 30 पर्यंत बंद राहणार असल्याचे पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
