

लेखक:तेजस सोनार
आज महामारीत सर्वात महत्वाची भूमिका आज डॉक्टर्स निभावत आहेत खरच खूप कौतुकास्पद काम सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स आणि तेथील स्टाफ अतिशय जिवावावर उदार होऊन काम करतांना दिसत आहेत हा माझा स्वतःचा अनुभव.
पण सोबतच दुसरी बाजू देखील एक निदर्शनात येत आहे की अनेक ठिकाणी रुग्णाला आणि नातेवाईकांना चुकीची वागणूक मिळते आहे आणि पैशा अभावी उपचार थांबवले गेल्याच्या तक्रारी देखील खूप आहेत. सामान्य माणूस ज्याला कदाचित तक्रार कुठे आणि कशी करावी याची माहिती मिळत नाही आहे. जिथे बेड आणि औषधांची माहिती मिळणार ते नंबर्स लागत नाही किंवा उचलत नाही ही परिस्थिती आहे.
त्यात पुन्हा रेमिडी सिविर चा घोळ हा वेगळाच त्याबद्दल अनेक संभ्रम सर्व नागरिकांमध्ये दिसून येत आहे आणि त्याची उपलब्धता अगदी कमी आहे. अनेक ठिकाणी काळ्या बाजारातून 10 हजार आणि त्यापेक्षा जास्त किमतीत हे इंजेक्शन मिळत आहे जिथे त्याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. डॉक्टर्स कडून देखील स्पष्ट सांगितले जात नाही आहे की याची आवश्यकता नेमकी कोणाला आहे “आम्ही स्कोर 12 व त्या पुढच्या लोकांना च देऊ तुम्हाला द्यायचे असेल तर बाहेरून manage करा अशा प्रकारे सांगण्यात येत आहे” अशा परिस्थितीत वणवण फिरून सुद्धा आणि 100 पेक्षा जास्त नंबर वर संपर्क करून सुद्धा इंजेक्शन मिळत नाही आहे जास्तीत जास्त नंबर वर तर कोणी उचलतच नाही आहे. त्यामुळे अधिक संभ्रम वाढत जात आहे.
बिलाबाबत च्या तक्रांरी हे अजून एक भयंकर वास्तव समोर आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते या बाबत आवाज उठवतांना दिसत आहेत हॉस्पिटल्स ला जाब विचारतांना दिसत आहेत पण उलट ज्या पेशंट ने त्यांना बोलावलं त्यांच्यावरच मानहानी चे दावे टाकण्याचे काम सुरू आहे (अर्थात पेशंट ने पण खरे राहणे तेवढेच गरजेचे आहे ) वैद्यकीय व्यवस्थेवर आलेला ताण समजून घेऊन तसेच सोबतच पेशंट ची आणि त्यांच्या नातलगांची देखील परिस्थिती समजून घेणे तेवढेच आवश्यक आहे. पारदर्शकता हा एक उपाय नक्कीच आहे किती रॅमिडीसीवर कोणाला दिले गेले याची माहिती इथून पुढच्या काळात हॉस्पिटल्स ने सर्वांसाठी खुली करून दिली तर कदाचित विश्वासार्हता वाढू शकते किती मिळाले आणि किती शिल्लक आहे याचा गोषवारा हॉस्पिटल बाहेत प्रत्येक 1 तासांत बाहेर लावून होणारा गोंधळ थांबवू शकतो.
वरील परिस्थिती आपल्या वैयक्तिक आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल तर आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे हाच रामबाण उपाय आहे. नाहीतर या सगळ्या भयंकर परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागणार.
