
वणी : नितेश ताजणे
सँनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार (४३)तर सुनिल महादेव ढेंगळे(३६)रा.देशमुखवाडी असे मृतकांचे नाव आहे.
सद्या लाकडाऊन असल्याने सर्वत्र दारुचे दुकाने बंद आहे. परिणामी दारुची लत असनारे विविध शक्कल लढवुन नशा पुर्ण करित आहे.
अशिच एक खळबळजनक घटना आज शुक्रवारी समोर आली आहे. गणेश उत्तम शेलार (४३) रा.जैताई नगर याला दारु न मिळाल्याने दोन दिवसांपासूनच सँनिटायझर पिल्याने त्याची अचानक प्रकृति बिगडली असता त्याला आज दि.२३ एप्रिल ला दुपारी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले परन्तु उपचारा दरम्यान गणेश चा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच देशमुख वाडी येथिल सुनिल महादेव ढेंगळे (३६) यानेही सँनिटायझर पिल्याने आज दि.२३ एप्रिल रोजी येथिल ग्रामिण रुग्णालयात सायंकाळी ६ वाजता दाखल केले मात्र उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. गणेश शेलार हा कुटुंब प्रमुख असुन त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले व वयोवृद्ध आई असा आप्त परिवार आहे.
लाकडाऊनमुळे शहरातील सर्व दारुचे दुकाने बंद असल्याने तळीरामांनी तलब भागविण्याकरिता सँनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर मिळाली आहे.
