महत्वाची बातमी: आबीद शेख हत्त्या प्रकरणी देवा नौकरकार याला गडचिरोली येथूनअटक,24 तासात कारवाई,पूर्व ठाणेदार पाटील यांच्या चमुची कारवाई

लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन व्हा .मिळवा तालुक्यातील प्रत्येक बातमी सर्वात आधी 👇👇👇

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

सहसंपादक:प्रशांत बदकी

वरोरा शहर दोन खुनाने हादरले असताना पोलीसांच्या कारवाई वर प्रश्न चिन्ह उभे केले जात होते .त्यामुळे तपास यंत्रणा अधिक कार्यक्षम करीत सर्वस्व पणाला लावीत ही कारवाई झालेली आहे.

वरोरा शहरात काल घडलेल्या आबीद शेख हत्याकांड प्रकरणात देवा हा फरारी होता पण आज आबीद शेख यांच्या परीजनाने जोपर्यंत मुख्य आरोपींना पकडणार नाही तोपर्यंत मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीसांनी तपास चक्रे फिरवून हत्त्यारा देवा नौकरकार याला पकडले. वरोरा येथे माजी ठाणेदार राहिलेले पाटील सध्या बल्लारपूर येथे कार्यरत आहे त्यांच्या पथकांनी देवा नौकरकार याला गडचिरोली येथून नुकतीच आज अटक करून वरोरा येथे आणण्यात येत आहे.