
दिनांक १७ मे २०२१ / पांढरकवडा
प्रतिनिधी:सुमित चाटाळे
कोरोना महामारी मुळे संपूर्ण देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन मुळे मागील वर्षापासून आत्तापर्यंत १३ करोड पेक्षा जास्त नोकर्या गेल्या आहेत. NCRB च्या रिपोर्ट नुसार दररोज ३८ सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या करत आहे. ह्या बेरोजगारी वर कोणताही पक्ष, कोणताही नेता आवाज ऊठवतांना दिसत नाही भारतीय बेरोजगार मोर्चा ने ह्या गोष्टिला गंभीरतेने घेऊन वाढती बेरोजगारी आणि केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात तीन टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली होती . . ज्याचा पहिला टप्पा ८ मे २०२१ रोजी राष्ट्रव्यापी काळी पट्टी निषेध आंदोलन च्या रूपात करन्यात आले.. आंदोलनाचा दुसरा टप्पा १२ मे २०२१ रोजी देशव्यापी EVM ची प्रतिमा जाळून सफल करन्यात आला.. आणि आज दिनांक १७ मे २०२१ रोजी समारोपीय आंदोलन नूसार प्रतिकात्मक डिग्री जलाओ आंदोलन चे आयोजन करण्यात आले होते.. ज्याच्यात सुशिक्षित बेरोजगार, केळापूर तालुक्यातील युवकांनी सरकार वर निशाना साधून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.. आणि आंदोलनाला सफल केले ..
भारतीय बेरोजगार मोर्चा ची मागणी आहे कि ज्या नोकरभरती वर सरकारने बंदी घातली त्या त्वरित हटवण्यात यावे.. आणि लवकरात लवकर रिक्त पदे भरन्यात यावे .. जो पर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा . .. Contract system ला बंद करून जुनेच सरकारी Permant भरती सुरू करन्यात यावी.. वयाची अट रद्द होन्या अगोदर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा… सर्व प्रकारच्या नोकर्यांमध्ये महिलांना त्यांच्या संखेच्या अनुसार प्रतिनिधित्व देण्यात यावे..
