वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव येथे रुग्णांना मास्क व फळवाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225).

राजूदासजी जाधव सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव रुग्णांना रुग्णांना मास्क व फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम 235 शिक्षक संघटना राळेगाव च्या वतीने राबविण्यात आला.
२२मेरोजी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र न २३५ चे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ चे संचालक मा.श्री राजुदासजी जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त २३५ शाखा राळेगाव तर्फे ग्रामिण रुग्णालय राळेगाव येथे कोविड व सामान्य रुग्ण यांना फळे व मास्क वाटप करण्यात आले.जिल्हाध्यक्ष जाधव सर हे वेळोवेळी कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकी जोपासण्याची शिकवण देतात त्यांची शिकवण म्हणून हा उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित केल्याचे मनिष नागतोडे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले. सोबतच रुग्णालयात अविरतपणे सेवा देणाऱ्या डॉक्टर व नर्सेस यांचेसुद्धा पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक श्री बी. यु. राऊत सर, श्री रमेशराव दवे सर, राजेंद्रजी पुडके, लक्ष्मणराव ठाकरे, पुरुषोत्तमराव वाटाणे, चंदूजी वानखडे, दोडेवार सर,परचाके सर, परिपगार सर व तालुक्यातील अन्य शिक्षक उपस्थित होते.