
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगाव येथील रहिवासी जिजा पुरूषोत्तम माथनकर (५८) यांचा सर्पदंशाने आज गुरूवार दि.२८आँक्टोबर रोजी शेतामध्ये कापूस वेचणी करत असताना सापाने दंश केल्याने उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करण्यास सुरूवात केली असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, यामध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभाग तसेच वन विभागाने तातडीने मदत करण्याची मागणी माथनकर यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.वेगाव येथील रहिवासी जिजा माथनकर व त्यांचे कुटुंबातील सदस्य सोबत त्यांच्या शेतात कापूस वेचणी साठी गेले होते. या दरम्यान गवतातील सापाने जिजा माथनकर यांना दंश केला. विषारी साप असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. ग्रामस्थांसह येथील डॉक्टरांनी शेतकरी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रशासनानेही त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असतानाच शरीरात सापाचे विषाचा फैलाव झाल्याने त्यांचा सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून याघटनेचा तपास सुरू केला आहे. तर माथनकर कुटुंबीयांनी कृषी विभाग तसेच वन विभागाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतक महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा,एक मुलगी , नातू असा आप्तपरिवार आहे.
