आ.अनिलबाबु देशमुख ,माजी गृहमंत्री ,म.राज्य यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना सॅनिटाईजर डिसपेंसर मशिनचे वाटप

ग्रामीण भागात कोरोना रोगामुळे थैमान घातल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये दररोजची रुग्ण संख्या ही वाढत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्षेत्राचे आमदार अनिलबाबु देशमुख यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत १८ सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन करीता निधी मंजूर करून उपकेंद्रांना मशिन उपलब्ध करून दिल्या. जिल्हा परिषद सदस्य सलिलदादा देशमुख यांच्या मागणीनुसार मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल मधील पांजरा(काटे), गरमसुर, मेंढेपठार बाजार, रिधोरा सह मतदारसंघातील १८ आरोग्य उपकेंद्र मध्ये सॅनिटाईजर डिस्पेंसर मशीन व सॅनिटाईजरचा वाटप आज दि.26/05/2021 रोजी नागपुर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महासचिव नितीन ठवळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, बाजार समिती संचालक बंडू राठोड, तालुका आरोग्य अधिकारी ठाॅ.शशांक व्यवहारे, आरोग्य अधिकारी डाॅ.हर्षवर्धन मानेकर,यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मेंढेपठार(बाजार)च्या सरपंच दुर्गाताई चिखले, पांजरा (काटे) च्या सरपंच विजुताई सरवरे, उपसरपंच राजु चरडे, ग्रा प सदस्य संजय सावरकर, प्रशांत पवार, मोती राठोड, भुषण मुसळे, सुमनताई कोहळे, सतिश कापसे, बबलू बराडे, मयुर इंगळे,रुपेश बुरडकर आदी उपस्थित होते.

.………