



प्रतिनिधी:सुमीत चाटाळे,केळापूर
लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/Kd29LKEGZMEK4Va1KfjbQ7
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने 6 जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार, असे शासनाने सर्वत्र निर्देश जारी केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. प्रस्थापितांच्या सत्ता पालथ्या करून अन्यायाविरुद्ध लढत स्वराज्याचा लढा उभारून आजच त्याचा राज्याभिषेक झाला होता..
आज पंचायत समिती, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना मिळालेल्या ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार सर्वत्र शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली व शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच शिवस्वराज्य दिन संपूर्ण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला.
तसेच तालुक्यातील अनेक राजकिय पक्ष, सामाजिक संघटनांनी गुढी उभारून, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शिवस्वराज्य दिन साजरा केला..
