
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
आज प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले जी यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा येथे आज वाढत्या पेट्रोल व डिझेल दर वाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. अशा आशयाचे फलक लावून आंदोलन कर्त्यांनी घोषणा दिल्या. व पेट्रोल पंपावर येणार्या नागरिकांना फुल देवून पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा दिल्या. व केंद्र सरकारचा निषेध केला आहे..
त्यावेळी पांढरकवडा तालुक्यातीलनेते कॉन्ग्रेस चे नेते मंडळी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
