
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
आज कोरोना काळात पर्यावरण आणि ऑक्सिजन यांचे महत्व जगाला चांगल्या प्रकारे कळले आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यावरण सेल अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी उत्तमनगर येथील परिसरात ऑक्सिजन युक्त रोपांचे वाटप करण्यात आले. एका ठिकाणी गर्दी न करता सोसायटी मध्ये जाऊन घरो घरी वृक्ष वाटप करण्यात आले. आणि पर्यावरण चे महत्व समजण्यात आले.एकूण 250 वृक्ष वाटप करण्यात आले.
प्रसंगी वंदनाताई पाटील, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, छावा ज़िल्हा अध्यक्ष आशिष हिरे, शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे, इम्रान अन्सारी, अक्षय पाटील आधी उपस्थित होते
