
लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा
राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची घेतली भेट
https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर
राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे विकास व उन्नत करण्यासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असताना मात्र विधमान महाविकास आघाडी शासनाने महामंडळावर पदाधिकारी नियुक्त केले नसल्याने कोणतेही निर्णय होत नाही तेव्हा शासनाने अल्पसंख्याक महामंडळवर पदाधिकारी नियुक्ती करण्याची मागणी भाजप प्रदेश अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी केली असून राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या हित रक्षणासाठी महामंडळ ची स्थापना करण्यात आली परंतु विधमान राज्य शासनाने अजूनपर्यत पदाधिकारी नियुक्त केले नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी ,शाळा मध्ये मिळण्यात येत असलेल्या शैक्षणिक सुविधा मदरसे मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळण्यात यावी आदी विषयावर राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचे सोबत विस्तृत चर्चा करण्यात आली
अल्पसंख्याक समाजाच्या हित रक्षणासाठी महामंडळ वर पदाधिकारी नियुक्ती करण्याची मागणी भाजप प्रदेश अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महामंत्री जूनेद खान यांनी केली असून या भेटी प्रसंगी प्रदेश सचिव अस्लम खान ,वरिष्ठ मार्गदर्शक रमजानभाई अन्सारी अश्विन तिवारी उपस्थित होते
