पहापळ आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेसाठी जिल्हाधिकारी यांना पत्रकार राहुल वऱ्हाडे यांचे निवेदन,तात्काळ नविन रूग्णवाहीका उपलब्ध न झाल्यास उपोषणाचा इशारा

:

प्रतिनिधी । पांढरकवडा:सुमित चाटाळे

लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/Kd29LKEGZMEK4Va1KfjbQ7

केळापुर तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एम एच २९ – ९५०१ क्रमांकाची रूग्णवाहीका आहे. सदर रूग्णवाहीका अतिशय जुनी झाली असुन त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. ही रुग्णवाहिका २००४ या वर्षाची असुन आरटीओच्या नियमांनुसार रूग्णवाहीकेची मुदत केव्हाचीच संपलेली आहे. सदर रूग्णवाहीका दोन लाख किलोमीटरच्यावर चालली असल्याने सदर रुग्णवाहिका सद्यस्थितीत बंद अवस्थेत उभी आहे. या संदर्भात नविन रूग्णवाहीका तात्काळ मंजुर करण्याकरीता पहापळ येथील पत्रकार राहुल वऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रुग्णवाहीका येत्या महीण्यात मंजुर न झाल्यास आरोग्य केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुध्दा निवेदनाव्दारे राहुल वऱ्हाडे यांनी दिला आहे.
सदर परिसर हा आदिवासी बहुल असून पेसामधे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ अंतर्गत एकुण ३० च्या वर गावे व अनेक आदिवासी पोड येत असुन परिसरातील १०० च्या वर रूग्ण दैनंदिन रूग्णालयात दाखल होत असतात. अपघात अथवा प्रकृती गंभीर असलेल्या रूग्णांना पुढील उपचारार्थ नेण्यासाठी या केंद्रात रूग्णवाहीका उपलब्ध आहे. मात्र सध्यास्थितीत ही रूग्णवाहिका अत्यंत जुनाट झाल्याने तिच्यात वारंवार बिगाड होत असल्याने सद्यस्थितीत बंद अवस्थेत उभी आहे. यामुळे गरोदर मातांची व ईतर रूग्णांची चांगलीच फजीती होत आहे. परिसरात खासगी रुग्णावाहिका नसल्याने रुग्णाना ऑटो अथवा इतर वाहनाद्वारे आपला जीव मुठित धरून रुग्णालया पर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात पहापळ आरोग्य केंद्राने जिल्हा आरोग्य विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केले आहे. तसेच मुदतबाह्य रूग्णवाहीकेबद्दल वारंवार विविध वृत्तपत्रात बातम्या सुध्दा येत असुन अद्यापही या समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधीसह आरोग्य विभागही लक्ष देताना दिसत नाही.
यामुळे पहापळ येथील पत्रकार राहुल वऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन पहापळ आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीका मंजुर करण्याबाबत मागणी केली. तात्काळ नविन रूग्णवाहीका उपलब्ध न झाल्यास आरोग्य केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुध्दा निवेदनाव्दारे राहुल वऱ्हाडे यांनी दिला आहे.