सावळी सदोबा येथे सर्वधर्मीय संमेलन (मा.डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी केले मार्गदर्शन)

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दूरक्षेत्र सावळी सदोबा येथे गुडीपाडवा , श्रीराम नवमी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गुडफायडे, हनुमान जयंती,रमजान ईद सारख्या धार्मिक सण उत्साहाच्चा पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व सामंजस्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच सामाजिक एकोपा व सौहार्दभाव टिकविण्यासाठी पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्र असलेल्या सावळी सदोबा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकांमध्ये सदभाव,संवाद,सलोखा व सर्वधर्मीय संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ (भा.पो.से) पोलीस अधीक्षक यवतमाळ हे प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, सर्वधर्मीय संमेलनाच्या कार्यक्रमाची सूरूवात करण्यात आली,या कार्यक्रमाला मुस्लिम मौलाना सय्याद सिरिज यांनी आपल्या धर्मा विषयी मार्गदर्शन करतांना आपण सर्व एक आहोत अशी शिकवण दीली,तर बौद्ध धर्माचे धर्मगुरु प्रा.सुमेध बोदी भंतेजी यांनी सुद्धा धर्माविषयी शिकवण दिली,आणि बंजारा धर्मगुरु कनिरामजी महाराज यांनी आपल्या धर्मावर मनोगत व्यक्त केले, हिंदू धर्मावर धनसिंग महाराज यांनी आपले मनोगत मांडले.मा.डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांना जय हिंद करत ,सावळी सदोबा सर्कल हा यवतमाळ जिल्ह्याचे हृदयस्थान असून हे एक शांत प्रिय सर्कल म्हणून जिल्हात या सर्कलची ओळख आहेत,या सर्कलचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे गौरवोद्गार काढले ते पूढे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आपण सर्वांनी अंगीकारायला पाहिजे, डॉ. बाबासाहेबांनी दीलेला वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे,बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारांमुळे कोणी सरपंच, कोणी जिल्हा परिषद सदस्य तर कोणी आमदार,कोणी खासदार झालेत,बाबासाहेब नसते तर मी पोलिस अधीक्षक झालोच नसतो, बाबासाहेबांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही,असे आपल्या भाषणात सांगत पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी या सर्कलमधील संपूर्ण अवैध धंदे बंद करत,पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये फिरते पोलीस स्टेशन हा उपक्रम राबविल्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक भुजबळ साहेबांनी पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. सर्वधर्मीय संमेलन कार्यक्रमाचे प्रस्ताविक पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार गजानन गजभारे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,या कार्यक्रमाला पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रदीप पाटील , सावळी भागातील लोकनेते बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, माजी जि.प.सदस्य प्रकाश राठोड,माजी जि.प.सदस्य सोनबा मंगाम, आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील राऊत , विरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे , आर्णी कूषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नुनेश आडे , सावळी सदोबा गावाच्या सरपंच अंजनाताई गेडाम, प्रल्हाद पाटील जगताप,प्रल्हाद गावंडे , अहेमद खान,अहेमद तंवर,राजु चव्हाण,मनोहर बहादे,वामन नाईक , शेषराव मुनेश्वर , विजय भगत, राहूल मुनेश्वर किसन राठोड , सिताराम राठोड व सावळी सदोबा परिसरातील पोलीस पाटील संघटना, तंटामुक्त अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती,तथा महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अजाणं साठी पोलीस अधीक्षक भुजबळ साहेब आपले भाषण मध्येच थांबवितात

पोलीस अधीक्षक श्री. दिलीप भुजबळ पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषण चालू असतांनाच मस्जिद मधिल‌ अजान‌ सुरू झाल्याचा आवाज येताच पोलीस अधीक्षक भुजबळ साहेबांनी अजानचा मान राखत आपलं भाषण दोन मिनिटे थांबविलं.
आणि अजान‌ होताच आपल्या भाषणाला पूर्ववत सुरूवात केली.

ठाणेदार चव्हाण साहेबांच्या डोळ्यात आनंदअश्रू आले

तीस वर्षानंतर असा कर्तबगार व दबंग ठाणेदार आमच्या परिसराला दिल्यामुळे आम्ही अक्षरशा पोलीस विभागाचे ऋणी आहोत असे उदगार या परिसरातील महिला भगिनींनी व सर्व पक्षिय नेत्यांनी पोलीस अधीक्षक श्री. दिलीप भुजबळ साहेबांसमोर व्यक्त करताच ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याही लक्षात आले की,या भागातील सर्व सामान्य नागरिक व सर्व पक्षिय राजकीय नेते त्यांना किती चाहतात हे पाहून ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या डोळ्यात अक्षरशा अश्रू आलेत.