
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 8/5/2022 रोजी काॅंग्रेस ओबीसी विभागाची बैठक काॅंग्रेस कार्यालयात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.या बैठकीला या बैठकीचे अध्यक्ष माजी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा काॅंग्रेस कमेटीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके सर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन नाईक, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविणभाऊ देशमुख, मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मनिषभाऊ पाटील, अशोकराव बोबडे,चंदूभाऊ चौधरी, अनिल गायकवाड, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यानंतर प्रमुख पाहुणे मंडळींनी ओबीसी आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे सर यांनी केले तर आभार अनिल देशमुख यांनी मानले. या बैठकीला काँग्रेस कमेटीचे ओबीसी विभागीय पदाधिकारी जया पोटे,स्वाती येंडे,प्रकाश जानकर, सह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सर्वश्री जाफरखान, संतोष बोरले,कृष्णा पुसनाके, हेमलता नवाडे, मिलिंद इंगोले, प्रविण कोकाटे, विजय मोघे , इरफान खान, आशिष महल्ले, राजेंद्र तेलंगे,श्रावनसिंग वडते, अशोक काचोळे, आशिष पारधी, विनायक बरडे, मोहन नरडवार,प्रा.अशोक पिंपरे,प्रतिक बोबडे, गजानन पाल, अंकुश मुनेश्वर, पुरूषोत्तम चिडे,प्रकाश पोपट, निश्चल बोबाटे, किशोर धामंदे,योगेश धांदे, राजेश विधाते,राजू विरखेडे, राजू गावंडे,शैलेश गुल्हाने,संतोष झेंडे,राजू डहाळकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, यासाठी वरीष्ठ पातळीवर नेते मंडळीशी पाठपुरावा करून ताबडतोब तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले.
