

प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर
NSUI राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनात NSUI चंद्रपुर विधानसभा कमेटी तर्फे जिल्हाधिकारी मार्फ़त महाविकास अघाड़ी सरकार ला निवेदन देऊन फी माफी ची मागणी NSUI अध्यक्ष शफ़क़ शेख यांनी केली.
कोरोना महामारी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात मध्यमवर्गीय लोक , शेतकरी , मजूर , व्यवसायिक तथा इतर वर्गातील लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला स्वत ची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्याची चिंता आहे . त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी व त्याचे पालक त्यांच्यावर ती आर्थिक ओझे वाटू नये याकरिता महाराष्ट्रातील बहुतांश शाळा व विद्यापीठानी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे निर्णय घेतले आहे . याचं एक उदाहरण म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व इतर विदयापीठातील परीक्षा शुल्क यांच्या तुलनेने 70 ते 80 टक्के जास्त असून आतापर्यंत विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता कुठल्याही प्रकारच्या योग्य निर्णय घेण्यात आले नाही.
त्या मुळे चंद्रपुर जिल्ह्यातिल अनेक शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांना घाइ करुंन फीस ची मागणी करीत आहे त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आह.
चंद्रपुर NSUI ने निवेदन देऊन आता होणाऱ्या परीक्षेत सरसकट शुल्क माफ करावे व नवीन शैक्षणिक सत्रा मध्ये ५०% रक्कम माफ करुंन प्रवेश देण्याची मागणी केलेली आहे.
या वेळेस NSUI नेते याकूब पठान NSUI विधानसभा महासचिव मनीष दास, बुद्धराज चादेकर( गड़चादुर NSUI) हिमांशु आवळे(शाखा अध्यक्ष पडोली) अक़ीब शेख , प्रणीत तोड़े, उमेश बर्डे ,मोंटी मंडाले, प्रज्वल कास्वते, प्रमोद शेंडे व अन्य सदस्यांचा शिष्टमंडळ उपस्थित होता.
