नवेगाव पेठ येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केली आर्थिक मदत

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर

    चिमूर 

               

आमदार बंटीभाऊ भांगडिया हे सातत्याने सामाजिक कार्यात मदत देत असतांना आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजून सहकार्य करीत असताना अश्यातच नवेगाव पेठ येथील सौ आशा हरिचंद्र राजूरकर हे कॅन्सर आजाराने त्रस्त असून उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली असता येथील जेष्ठ नेते दिगाबरराव खलोरे यांनी दखल घेऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना सांगितले .तेव्हा त्यांनी तात्काळ भरीव आर्थिक मदत दिली .

नवेगाव पेठ येथील सौ आशाबाई हरीचंद्र राजूरकर( वय 60 वर्ष ) ही महिला कॅन्सर आजाराने त्रस्त असतांना निरामय हास्पिटल नागपूर येथे आजाराची उपचार घेत आहे .त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने उपचार करणे अवघड असल्याने ही बाब दिगाबरराव खलोरे यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कानावर सांगितले. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी कॅन्सर रुग्णाच्या पतीस हरीचंद्र राजूरकर यांना आर्थिक मदत दिली.

आर्थिक मदत देत असताना दिगाबरराव खलोरे,गुलाबराव मनमोकर, रमेशजी कंचर्लावार, राजू झाडे सुधाकर राजूरकर आदी उपस्थित होते.