गोळीबारीने यवतमाळ शहर हादरले ; तरुणाचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225).

यवतमाळ येथील शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या स्टेट बँक चौकात बुधवारी रात्री आठ ते साडे आठ वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला असुन यामध्ये करणजीत परोपटे याचा जागीच मृत्यू झाला. मृतक हा कुप्रसिध्द अक्षय राठोड टोळीचा सदस्य आणि अक्षय राठोड यांचा जवाई होता. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असून चार ते पाच व्यक्ती कडुन हा थरार घडवण्यात आला असल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी स्थानिक धामणगाव रोडच्या चांदोर नगरमध्ये दोन गटात वाद झाला होता. याच कारणाने गोळीबार केला असावा, अशी प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे.

सदर घटनेत करणजीत परोपटे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव दरणे, उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप सिरस्कर घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलिस ठाण्यांसह पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून करणजीतचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, तर त्याच्या साथीदाराला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. बातमी लिहिस्तोवर हा हल्ला कोणी केला? व त्यामगचे नेमके कारण काय? हे मात्र कळू शकले नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप सिरस्कर घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस करीत आहे.