अखेर… गोंडवाना विद्यापिठाचा विद्यार्थ्यांवर दिलासा महाराष्ट्र युनियन चंद्रपूर स्टूडेंटच्या मागणीला यश

राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टूडेंट युनियन चंद्रपूर राज्य सरकारकडे व गोंडवाना विद्यापीठला या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता.याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता राज्यपाल महोदयांचीही भेट घेऊन मागणी केली होती.
नागपूर विद्यापीठातही संघर्षाची भूमिका घेत यशस्वी आंदोलन करत सदर शुल्कात सूट मिळवून घेतली होती.त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.
ठीक आहे,
मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल आपले आभार मानले आहेत.