
काटोल :-ऋषिकेश जवंजाळ
रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणांची हलाकीची परिस्थिती त्यातच वडिलांचे छत्र हरविल्यानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आचार्य पदवी मिळवून सुयश मिळविले. या यशवंत तरुणाचे नाव अमोल वसंतराव मुसळे आहे. त्याने आईचे कष्टाचे चीज करून मातेच्या अपेक्षा पूर्ण केला. अमोलने रा. तु. म. नागपूर विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त केली. ‘ सोसिअल रिऑलियम इन चेतन भगतस नोव्हेल्स ‘ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यापूर्वी अमोल मुसळे हा इंग्रजी साहित्यातील सुवर्ण पदकाचेसुद्धा मानकरी ठरला आहे. एक उत्कृष्ट वक्ता, विचारक अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते सूर्योदय कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या परिवाराला दिले.
