नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा

वरोरा:- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामखुला येथे भव्य रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 42 प्रहारसेवकानी रक्तदान केले.रक्तदान शिबिर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात घेण्यात आले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रहारसेवक महेश पाटील, मिथुन कुडे, आकाश बावणे, आकाश येरेकर, स्वप्नील पंकज शेंडे , अमोल माहुरे ,रवी येरेकर, गणेश सलेकर, गणेश देठे, दिवाकर येरेकर, सागर वानखेडे, अक्षय भलमे, सागर चव्हाण, राहुल टिपले, गजानन देवतळे, सूरज घुबडे, प्रतीक पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.