
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
:वरोरा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून असलेले अशोक सलामे यांचा ख्रिस्त हॉस्पिटल चंद्रपूर येथे आज दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला.
वरोरा तहसील मध्ये दि ४ एप्रिल ला तहसील कार्यालयात काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांचा कोविड- १९ चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते , त्यात पुन्हा दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता अश्या सर्व १४ कर्मचाऱ्यावर उपचार चालू असताना आज दुपारी नायब तहसीलदार यांचा मृत्यू झाला , त्यांच्या मागे ३ मुले पत्नी असा आप्तपरिवार आहे त्यांच्या जाण्याने वरोरा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.एक गोड स्वभावाचा अधिकारी असा अचानक सोडून गेल्याने नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.
