बार व देशी दारूचे दुकाने गावाबाहेर हलवा:शेगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दारुड्यांचा गराडा गावाबाहेरच हवा

लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी उठविल्यामुळे शेगावात असलेला बार व देशी दारूचे दुकान जुन्याच ठिकाणी सुरू करण्यासाठी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.परंतु हे दोन्ही बार व देशी दारूचे दुकान गावात असून आजूबाजूला संत काशिनाथ कन्या विद्यालय, बौद्ध विहार ,मस्जिद व बँक असल्याने दारुड्यांचा त्रास सहन करावा लागेल म्हणून दारूचे दुकान व बार गावाबाहेर सुरू करा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.गावातील शाळकरी मुली ची शाळा याच परिसरात असल्याने दारुड्यांचा गराडा इथेच राहणार व पिऊन शिवीगाळ करणे ,पडून राहणे ,अश्लील बोलने ऐकावे लागू नये यासाठी हा बार व देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलवणेच योग्य पर्याय असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.यामागणीसाठी प्रफुल्ल वाढई, रेखाताई कवडू दडमल ,राजू राऊत ,अभिषेक रायपूरकर ,सतीश गायकवाड ,साधनाताई मानकर ,चंद्रशेखर का1पडे, चिरंजीवी रावी, वैभव वाघमारे व इतर गावातील सजग नागरिकांनी केली आहे.