
वरोरा दि. ५ जुन २०२२
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित महारोगी सेवा समिती, आनंदवन व्दारा संचालित, आनंद निकेतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवात सकाळी सहा वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर योगा, एन.एस. एस. च्या विद्यार्थ्यांना 5 जून या दिनाचे औचित्य साधून त्यादिवसाचे विशेष महत्त्व, पर्यावरणाचे प्रत्येक नैसर्गिक बाबींचा आपण संगोपन, संवर्धन, संरक्षण केले पाहिजे. असे प्रा. राधा सवाने यांनी सांगितले. पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महाविद्यालयात श्रमदान आणि आनंदवन येथे वृक्षारोपण करण्यात आले. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन येथे वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रमात महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कंडु गुरुजी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड, डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. संदिप पारखी तथा महाविद्यालयाचे सर्व एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार करून संपन्न झाला.
