शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेमजई येथे कृषी दूतांनी राबविले स्वच्छ्ता अभियान

खेमजई येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामवासीयां सोबत मिळून ग्राम स्वच्छता अभियान राबविले. यामधून असे जाणवले की आजपण लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता आहे. त्यामध्ये गावातील महिलांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.

उपस्थित सरपंच मनीषा चौधरी , पोलीस पाटील विश्वनाथ तुरणकर, शेतकरी मित्र शत्रुघ्न शेरपुरे, कृषी सहायक लता दुर्गे मॅडम, शिवराय निब्रड, भाऊराव दडमल व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

यात कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आनंद पाटील, आदर्श खोब्रागडे, रीतिक नागदेवते आणि अक्षय कोहपरे
प्रा. डॉ. सुहास पोतदार सर, डॉ. रामचंद्र महाजन सर, डॉ. स्वप्नील पंचभाई सर, डॉ. मुकुंद पातोंड सर, डॉ. सतीश ईमडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यामध्ये गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.