विरोधकांच्या कुरघोड्या सुरूच, स्वतंत्र उमेदवार प्रशांत बदकी पॅक झाल्याची अफवा, उमेदवारांचे बॅनर फाडण्याचे प्रकार सुरू

बोर्डा गावात काही लोकांकडून प्रशांत बदकी हा स्वतंत्र उमेदवार पॅक झाल्याची अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्वतः प्रशांत बदकी यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.बोर्डा गावात काही लोकांकडून अश्या अफवा पसरविण्याचे काम खूप जोमात चालते.या वरून स्वतंत्र उमेदवार इतरांना भारी पडत असल्याचे बोलले जात आहे.
बोर्डा गावात ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून बोर्डा गावातील तरुण पिढी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.त्यामुळे ज्या उमेदवारांनी या आधी गावातील विकासकामांसाठी प्रयत्न केले अश्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचे प्रकार सुरू आहे .वांदिले हार्डवेअर जवळ प्रशांत बदकी या स्वतंत्र उमेदवाराने लावलेल्या बॅनर ला काही अज्ञात लोकांनी फाडल्याची घटना घडली आहे .
प्रशांत बदकी हे बोर्डा गावातील वॉर्ड क्रमांक 2 मधील स्वतंत्र उमेदवार आहेत.त्यांनी मागील काळात कित्येकाना मदत केली आहे .कोरोनाच्या काळात बोर्डा गावातील पाणीपुरवठा योजना बंद झाली तेव्हा झोपडपट्टी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागायच तेव्हा नागरिकांना सोबत घेऊन घागर आंदोलन देखील केले,तसेच बोर्डा गावातील नागरिकांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला .बोर्डा गावातील वॉर्ड क्र 1 मध्ये असलेल्या भागात नाल्यांची सुविधा नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस देखील त्यांनी पाठपुरावा करीत ती नाली मंजूर करून पूर्णत्वास आणली. अश्या कर्तबगार उमेदवाराचे बॅनर फाडून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे .