
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली परंतु आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव घोरात पडला आहे सुरुवातीला जोरात आलेल्या पावसाने आता दडी मारून घोरात टाकल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात केलेली पेरणी चांगल्या प्रकारे उगवल्याने व जोमात आलेले पीक कोमात जात असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कसरती कराव्या लागत आहेत.
राळेगाव तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या आटोपवल्या असून तालुक्यात पूर्णता पेरणी झाली आहे सध्या शेतात कोवळे अंकुर असल्याने पावसाने दडी मारल्याने अंकुर सुकण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. माहागा मोलाचे बी बियाणे खत टाकून पेरण्या केल्या सुगी साधणार म्हणून शेतकऱ्यांनी खर्च केला आता मात्र पिकांना ताण पडत आहे आता पावसाने दांडी मारली आहे आभाळ दाटून येते मात्र थेंब थेंब किंवा एखादा दुसऱ्या सरी शिवाय पाऊस पडत नाही पहिल्या टप्प्यात झालेल्या पेरणी आता धोक्यात सापडले आहेत ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी ठिबक सुरू केली आहे जमिनीखाली थोडाफार ओलावा असल्याने कोवळी पिके तक धरून आहेत अन्यथा पिके आतापर्यंत सुकली असती आता तर पाऊस कधी होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या माहागा मोलाचे बियाणे पेरून शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे अगोदरच कोरोनाने कंबरडे मोडले दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले त्यातच शेतीमालाला भाव नाही त्यामुळे अडचणीत सापडलेला असून जर दोन तीन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट मात्र निश्चित दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागल्या आहे.
