हिवरा येथे आ. समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते भूखंडाचे पट्टे वितरण कोरोना योद्धयांचाही केला सत्कार

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव

हिंगणघाट व समुद्रपूर मतदार संघाचे आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते भूखंडाच्या पट्टे वितरण व कोरोना योद्धयांचाही केला सत्कार

           

शासनाची सर्वासाठी घरे योजना आहे. अनेक नागरिकांना राहण्यासाठी निवारा नसल्याने गावातच अतिक्रमण कैलेल्या जागेवर निवास करीत होते, तालुक्यातील हिवरा येथील गावकऱ्यांनी अतिक्रमण कैलेल्या भूखंडाचा प्रश्नसुद्धा बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. परंतु शासनाच्या आदेशानुसार सदर अतिक्रमण धारकांना आज दि.२१ रोजी कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते पट्टेवाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचेवेळी कोरोनाकाळात कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या अंगनवाड़ी सेविकांनी कैलेल्या कामाबद्दल सत्कारही करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती माधवभाऊ चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सौ.शारदाताई आंबटकर,माजी जि.प.अध्यक्ष नितिन भाऊ मडावी,माजी प.स.सभापती गंगाधररावजी कोल्हे,हिवरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ.शोभाताई कुडमेथे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात एकूण ३६ गावकऱ्यांना आमदार समीरभाऊ कुणावार यांचे हस्ते अतिक्रमण कैलेल्या जागेचे पट्टे वाटप करण्यात आल्याने सदर गावकऱ्यांच्या निवास्थानासाठी भुखंड पट्टे देण्यात आल्याने त्यांचे निवासाचा प्रश्न कायमचा सुटला आहे,आ. समीरभाऊ कुणावार यांचे प्रयत्नामुळे सदर भूखंडाचे कायमस्वरूपी पट्टे मिळाले,यामुळे सदर लाभार्थ्यांनी आमदार समीरभाऊ कुणावार यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमात उपसरपंच नामदेवराव उगे,रेखाताई रहाटे,देवीदास कुड़मते, तलाठी पाटनकर,ग्रामसेवक स्नेहलताई महाजन,राजेंद्रजी राडे,मिनाक्षीताई ईखार इत्यादी मंडळी उपस्थित होती.