वितरकाला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी. तालुका पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


दैनिक देशोन्नती राळेगांव शहर वितरक विनोदभाऊ रामदासजी काळे यांना क्षुल्लक कारणाने विनायक अनंत महाजन याने अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिली या निंदनीय घटनेचा राळेगांव तालुका पत्रकार संघ,राळेगांव तालुका वृत्तपत्र वितरक संघटना यांचे वतीने तीव्र निषेध नोंदविला असून,पोलिस तक्रारी अंती जे गुन्हे दाखल केले त्या पेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असा ठराव आजच्या विशेष निषेध सभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे. या वेळी राळेगांव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अशोकराव पिंपरे,प्रकाशजी मेहता,डाॅ.कैलासजी वर्मा,महेशभाऊ शेंडे,प्राचार्य मोहनभाऊ देशमुख,फिरोझभाऊ लाखाणी,राजेशभाऊ काळे,राष्ट्रपालजी भोंगाडे,संजयभाऊ दुरबुडे,महेशभाऊ भोयर, सचिनजी राडे, वितरक विनोदभाऊ काळे
सचिव मंगेशभाऊ राऊत हे उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक राळेगांव यांना आज सायंकाळी भेटून कडक कारवाई ची मागणी राळेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने करण्यात येणार आहे.