
चिंचाळा गावात ग्रामपंचातीतर्फे बनवल्या गेलेल्या हॉस्पिटल मध्ये चंद्रपूरातील तीन तरुण चोरी करीत असल्याची खबर गावकऱ्यांना लागली.रात्री 10 वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तिघेही चोर गावालगतच्या हॉस्पिटल मध्ये चोरी करण्यास गेले असता त्यांनी त्या जागी तोडफोड करत आणि चोरीचा प्रयत्न केला. व संपूर्ण हॉस्पिटलच्या साहित्य अस्ताव्यस्त करून टाकला. गावाकऱ्यांना सुगावा लागताच सर्व गावकरी याचा फितुरीने सर्व हॉस्पिटल मध्ये येऊन पोहोचले चोर आतल्या खोलीत दडून बसले असता त्यांना पडकण्यात गावकऱ्यांना यश आले.या चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.या प्रकारे चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरांचे बिंग फुटले.
